![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-Holkar-Death-Anniversary-1-380x214.jpg)
Ahilyabai Holkar Punyatithi 2022 Messages: अहिल्याबाई होळकर यांची 26 ऑगस्टला तिथीनुसार पुण्यतिथी आहे . वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्याबाईंनी जगाचा निरोप घेतला होता. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला होता. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या अहिल्याबाई वर सासऱ्यांचा खूप विश्वास होता. त्या भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले होते. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी किंवा श्रावण महिन्याच्या चौदाव्या दिवशी पाळली जाते. राणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 26 ऑगस्ट रोजी आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त खास HD Images, Photos ,WhatsApp Status, Facebook Messagesसोशल मीडीयामध्ये शेअर करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करा. [हे देखील वाचा: Women's Equality Day 2022: भारताची मान अभिमानाने उचावण्यात 'या' महिलांचा आहे मोलाचा वाटा; महिला समानता दिनामिनित्त जाणून घ्या देशाचे मूल्य वाढवणाऱ्या महिलांविषयी]
पाहा, अभिवादन Messages
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-Holkar-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-Holkar-Death-Anniversary-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-Holkar-Punyatithi-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Ahilyabai-Holkar-Punyatithi-2021-1.jpg)
महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केली. अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. गुजरात मधील सोरटी येथील सोमनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. असे पुण्याचे काम अहिल्यादेवी करीत होत्या. अहिल्याबाई होळकर यांचा नातू तेराव्या वर्षी मरण पावला. काही दिवसातच जावई लढाईत शहीद झाले आणि मुलगीही सती गेली. आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांचे निधन झाले.