Ahilyabai Holkar Punyatithi 2022 : अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी आहे . वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्याबाईंनी जगाचा निरोप घेतला होता. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला होता. स्त्रीशिक्षण प्रथा नसतानाअहिल्याबाई यांच्या वडीलांनी त्यांना लिहण्या-वाचण्यास शिकवले होते. पती खंडेराव हे व्यसनी होते. पण अहिल्याबाईंनी तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार अहिल्याबाईंवरच सोपवत असत. अहिल्याबाई होळकर या स्वभावाने स्वाभीमानी आणि शूर होत्या. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या आणि स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने प्रजेची मने जिंकली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले होते. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त खास HD Images, Photos ,WhatsApp Status, Facebook Messagesसोशल मीडीयामध्ये शेअर करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करा.[हे देखील वाचा: 75th Independence Day: राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण फडकावणार तिरंगा]
पाहा, अभिवादन संदेश
इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले पण अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. कारण "पुण्यश्लोक" अहिल्याबाईंनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. अनेक काळापासून सुरु असलेल्या प्रथा मोडून काढत अनेकांसाठी आदर्श बनल्या.