
Ahilyabai Holkar Punyatithi 2022 : महाराष्ट्रात कुशल प्रशासकांच्या यादीमध्ये अनेक कुशल राज्यकर्त्या स्त्रियांनीही नावे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे एक नाव म्हणजे “अहिल्याबाई होळकर” आहे. अशा स्वराज्यनि स्त्रीयांमुळे महाराष्ट्राला कर्तृत्त्ववान स्त्रियांचा वारसा लाभला आहे. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील जामखेड मध्ये झाला होता. उत्तम शासक आणि योग्य न्याय करणारी राणी म्हणून त्यांची ओळख होती. राणी अहिल्याने समाजाच्या हिताचे कार्य करून अनेक कुप्रथा बंद केला आणि समाजाला नवीन दिशा दिली. उत्तम राज्य केल्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्याबाईंनी जगाचा निरोप घेतला होता. 13 ऑगस्ट हा अहिल्याबाईंचा पुण्यतिथीचा दिवस. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त खास HD Images, Photos, WhatsApp Status, Facebook Messages सोशल मीडीयामध्ये शेअर करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करा.
पाहा, अभिवादन Messages





अहिल्याबाई होळकर यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला. सतीला विरोध करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे देखील उल्लेखनीय कार्य केले. इतिहासात एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांची तुलना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" अशी केली आहे.