Bra Care Tips: कप ब्रा धुण्याची 'ही' योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
Cup Bra (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्याच्या काळात महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याला ब्रा (Bra) न वापरणे वा योग्य आकाराचे चांगल्या दर्जाचे ब्रा न वापरणे अशी बरीच कारणे असतात. त्यामुळे ब्रा चांगल्या दर्जाचे वापरण्यासोबत स्तनांनुसार, योग्य आकाराचे ब्रा वापरणे देखील तितकेच गरजेचे आहे. यासोबत त्या ब्रा नीट काळजी घेणे हे देखील गरजेचे आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल नीट काळजी घेणे म्हणजे नक्की काय करायचे? तर याचे उत्तर आहे नीट स्वच्छ धुवून सुकवणे हे आहे.

आपल्यापैकी कित्येक तरी महिला वा मुली कप ब्रा (Cup Bra) जास्त वापर करतात. पण अनेकदा त्यांना त्या ब्रा कशा धुवायच्या हे माहित नसल्यामुळे सामान्य कपड्यांप्रमाणे ते या ब्रा धुतात. ज्यामुळे त्याचा आकार बिघडतो. यासाठी कप ब्रा धुताना खाली दिलेल्या विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

1. कप ब्रा साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात कपड्यांची पावडर टाकावी आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.

2. त्यानंतर ही कपड्यांच्या ब्रशने चोळता टूथब्रशने त्या ब्रा कडा आणि पातळ भाग घासाव्यात.

3. मग ती ब्रा स्वच्छ पाण्यात धुवून काढावी.

4. ही प्रा धुताना ती जोरजोरात चोळू नये, पिळू नये यामुळे कपचा आकार बदलतो. आणि सुकल्यावर तो भाग आकसतो.

5. कप ब्रा हलक्या हातांना पाण्यातून बुडवून काढावी त्यानंतर ती न पिळता एका सुक्या टॉवेलकर निथळून द्यावी.

6. मग दोन कपच्या मधल्या भागावर क्लिप लावून ती सुकत ठेवावी. कप ब्रा सुकवताना त्याच्या पट्ट्यांच्या साहाय्याने ती कधीच सुकवू नये. यामुळे ती फाडण्याची शक्यता असते.

कप ब्रा सुकल्यावर त्याचा कपचा भाग न दुमडता त्यात कपमध्ये त्याचे पट्टे दुमडून ती व्यवस्थितरित्या कपाटात ठेवावी. अशा पद्धतीने तुमची कप ब्रा धुतल्यास महिलांना तसेच मुलींना कोणताही त्रास होणार नाही आणि त्वचाही चांगली राहील.