दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. अखेर चाहत्यांना दिलेल्या प्रॉमिसनुसार दीप वीर या जोडीने त्यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. सिंधी आणि बेंगलोरी पद्धतीने (kannadiga style wedding ) लग्न झाल्यानंतर दोन्ही विधींदरम्यानचे खास फोटो शेअर करताना दोघांनीही हार्ट स्माईली शेअर केली आहे. Deepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो
दीपिकाचा ब्रायडल लूक
सिंधी आणि बेंगलोरी (kannadiga style wedding) अशा दोन्ही लग्नविधींमध्ये दीपिकाने लाल रंगाचा वापर केला होता. दीपिका आणि रणवीरचा लग्नाचा लूक सब्या साचीने डिझाईन केला होता. सिंधी पद्धतीने पार पडलेल्या लग्न सोहळ्यात दीपिकाच्या ड्रेसवर लाल आणि सोनेरी जर वापरण्यात आली होती. दीपिकाची डोक्यावरील चुनरीच्या भागात खास आर्शिवाद रुपी 'सदा सौभाग्यवती भव' हा मंत्र लिहण्यात आला होता.
रणवीरचा लूक
दीपिकाला साजेसा रणवीराचाही लूक होता. लाल आणि गोल्डन जरीमध्ये शेरवानी डिझाईन करण्यात आली होती. त्यावर कुंदन वर्क केलेले दागिने होते. बेंगलोरी (kannadiga style wedding) स्टाईलमध्ये करण्यात आलेल्या लग्नामध्ये रणवीरने पांढरा सदरा कुडता घातला होता.
इटलीच्या लेक कोमो परिसरात विवाहाचे सारे विधी पार पडल्यानंतर दोन्ही कुटुंबीय भारतामध्ये परतणार आहेत. येथे बेंगलोरला २१ नोव्हेंबर ते मुंबईत २७ नोव्हेंबरला रिसेप्शन पार्टी आणि सेलिब्रेशन ठेवण्यात आले आहे.