![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/talllook-380x214.png)
अनेक मुली अपडेटेड फॅशन ट्रेन्ड्स फॉलो करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. सेलब्रिटी फॅशन ट्रेन्डकडे अनेकांचा कल असतो. मग त्यामध्ये उंच दिसण्यासाठी खास प्रयत्न केले जातात. दीपिका पादुकोण, सई लोकूर, पूजा सावंत अशा अभिनेत्रींना पाहून अनेकींना हेवा वाटतो. अगदी लेदर जिन्स असो किंवा नक्षीदार मोठ्या डिझाईन्सच्या साड्या.... उंच मुलींवर हे सारं खुलून दिसतं.
साधरणपणे उंची ही विशिष्ट वयापर्यंतच वाढते. त्यामुळे कालांतराने उंच दिसण्यासाठी तुम्हांला औषधगोळ्या किंवा वैद्यकीय मदत फारशी उपयुक्त ठरणार नाही. त्यावेळेस तुम्हांला फॅशन ट्रिक्सच मदत करू शकतात.
उंच दिसण्यासाठी कपडे कसे निवडाल ?
हाय वेस्ट जिन्स
आजकाल हाय वेस्ट जिन्सची फॅशन पुन्हा आली आहे. त्यामुळे तुम्हांला उंच दिसायण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर हाय वेस्ट जिन्स निवडा. त्यावर क्रॉप टॉप्स खुलून दिसतात.
पलाझो
पलाझो हा देखील उत्तम इंडो-वेस्टर्न लूक देणारा पर्याय आहे. पलाझो तुम्ही नेहमीच्या कॅज्युअल लूक प्रमाणेच सण समारंभारतही कुर्तीसोबत टीम अप करू शकता. यामुळे तुमचा लूक खुलून दिसेल.
फ्लोअर लेन्थ अनारकली किंवा गाऊन
आजकाल लग्नांमध्ये किंवा सण समारंभांमध्ये प्रामुख्याने खास डिझायनर कपडे निवडले जातात. अशामध्ये अनारकली ड्रेस, गाऊन हे उत्तम ट्रेडिशनल कपडे आहेत. मात्र अशा कपड्यांची निवड करताना पायापाशी फार जड इम्रोडरी असणार नाही याची काळजी घ्या.
हिल्स
उंच दिसण्यासाठी एक पर्याय म्हणजे हिल्स. मात्र सतत किंवा प्रमाणापेक्षा अधिक काळ हिल्सचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. यामुळे पायदुखी, पाठीचं दुखणं, सांध्यांचं दुखणं वाढू शकतं. ठराविक कार्यक्रमात ब्लॉक हिल्स, वेजेस वापरणं आरामदायी आहे.
कोणत्या चूका कटाक्षाने टाळाल ?
बुटक्या किंवा कमी उंचीच्या मुलींना स्ट्रेट कटमधील लेन्थ कुर्तीज, पंजाबी ड्रेस टाळावेत.