Jawan Missing from China Border: अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर तैनात जवान 14 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबिय चिंतेत
प्रतिकात्मक फोटो (PC -File photo)

Jawan Missing from China Border: अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवर (China Border) 7 व्या गढवाल रायफलमध्ये तैनात डेहराडूनचा जवान प्रकाश सिंह राणा (Prakash Singh Rana) 14 दिवसांपासून बेपत्ता (Missing) आहे. त्यांचे कुटुंब मूळचे रुद्रप्रयागचे आहे. जवान बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या बटालियनच्या अधिकाऱ्यांनी पत्नीला दिली आहे. सहसपूर विधानसभा मतदारसंघातील आंबीवाला येथील सैनिक कॉलनीतील रहिवासी आणि भारतीय सैन्यात नायक म्हणून तैनात प्रकाश सिंह राणा यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान प्रकाश सिंह राणा यांचे कुटुंब डेहराडूनमधील सैनिक कॉलनी अंबीवाला येथे राहते. तर त्यांचे मूळ निवासस्थान उखीमठ, रुद्रप्रयाग येथे आहे. ते 7 व्या गढवाल रायफलमध्ये तैनात आहेत. सध्या त्यांची अरुणाचल प्रदेशच्या चीन सीमेवरील ठकाला पोस्टवर ड्युटी सुरू होती. (हेही वाचा - Nitin Gadkari यांच्या अटीवर खासदार Anil Firojiya यांनी कमी केलं 15 किलो वजन; गडकरींकडे केली 15 हजार कोटींची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

जवानाच्या पत्नी ममता राणा यांनी सांगितले की, त्यांना 29 मे रोजी त्यांच्या बटालियनच्या सुभेदार मेजरने बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. या जवानाच्या पश्चात पत्नी ममता, 10 वर्षांचा मुलगा अनुज आणि सात वर्षांची मुलगी अनामिका असा परिवार आहे. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकांनी त्यांचे घर गाठून पत्नीला हिंमत दाखवण्याचा सल्ला दिला.

प्रादेशिक आमदार सहदेवसिंग पुंडिर यांनी जनाच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि ते सुखरूप परत येतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशीही बोलून बेपत्ता सैनिकाचा शोध घेण्याची विनंती केली. आमदारांनी सांगितले की, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी शोध मोहीम सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांनी कुटुंबीयांनी धीर धरण्याचे आवाहन केलं आहे.