Naxalites Killed In Chhattisgarh: दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक, तीन महिला नक्षलवादी ठार
Security forces (Pic Credit - ANI)

दंतेवाडा जिल्ह्यात (Dantewada District) रविवारी सुरक्षा दलांशी (Security forces) झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवादी (Women Naxalites) ठार झाल्या आहे. या महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव (Dantewada Superintendent of Police Abhishek Pallava) यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक जवान शोध मोहीम राबवत असताना रविवारी सायंकाळी 6 वाजता सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. अडवल आणि कुंजेराच्या जंगलात (forests of Adwal and Kunjera) जिल्हा राखीव रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असे त्यांनी सांगितले. हेही वाचा Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, महिलेचा मृत्यू, आरोपी अटकेत

पल्लव यांनी सांगितले की, राजे मुचकी, गीता मरकम आणि ज्योती उर्फ ​​भीमे नुप्पो अशी ठार झालेल्या महिला माओवाद्यांची नावे आहेत. तिघेही माओवाद्यांच्या काटेकल्याण एरिया कमिटीचे सक्रिय सदस्य होते. या तिघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

घटनास्थळावरून 12 बोअरची बंदूक, दोन देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर, एक माजल लोडिंग बंदूक, दोन इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी), वायर, औषधे, माओवादी साहित्य आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. सविस्तर माहितीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.