Vegetable Theft: चोरट्यांनी चक्क भाजी मंडईला टार्गेट करून टोमॅटो, लिंबू आणि सिमला मिरचीवर मारला डल्ला
Thief (Image used for representational purpose) (Photo Credits: Pixabay)

गुडगावच्या (Gurgaon) खांडसा भाजी मंडईतील (Khandsa vegetable market) एका दुकानातून टोमॅटोचे 35 क्रेट (प्रत्येक क्रेट 25 किलो), लिंबाच्या 500 किलो वजनाच्या 10 गोण्या आणि 300 किलो कॅप्सिकम असलेली 15 पॅकेट चोरीला (Vegetable theft) गेल्याचा आरोप पोलिसांनी शुक्रवारी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि गुरुवारी सकाळी पोलिसांना कळवण्यात आले. ज्या दुकानात चोरीची घटना घडली त्या दुकानातील चालक संदीप सिंग यांनी सांगितले की, त्यांनी बुधवारी रात्री दुकानात टोमॅटोचे क्रेट, लिंबाची पोती आणि सिमला मिरची असलेली पॉलिथिनसह भाजीपाला ठेवला होता.

सकाळी भाजी चोरीला गेल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही दाराला कुलूप लावत नाही. रात्री शेड बंदच राहते आणि सुरक्षा रक्षकही नसतो. मी येथे काम करत असल्यापासून पहिल्यांदाच चोरीची घटना घडली आहे. आमचे 50,000 ते 55,000 रुपयांचे नुकसान झाले आहे, सिंग म्हणाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,  तपासात असे आढळून आले आहे की चार आरोपी एका कारमध्ये आले आहेत. हेही वाचा MNS Melava: राज ठाकरे यांचा आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद; मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन

एकजण गाडीत बसलेला असताना त्याच्या तीन साथीदारांनी शेडमधील भाजीपाला कारमध्ये भरून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की , शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 380 (घरात चोरी इत्यादी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

घाऊक खांडसा मंडईतील भाजी विक्रेत्यांनी सांगितले की, टोमॅटोचे भाव गेल्या काही दिवसांत जवळपास दुपटीने वाढले असून, पंधरवड्यापूर्वी 600 रुपयांना विकल्या जाणार्‍या टोमॅटोची (24 किलो) पोती 1,200 रुपयांना जात आहे. खांडसा मंडी असोसिएशनचे सचिव नीरज यादव म्हणाले, टोमॅटोच्या किमतीत वाढ मुख्यतः पुरवठ्यातील कमतरता आणि अंशतः उत्तरेकडील राज्यांमधील अवकाळी पावसामुळे झाली आहे.