MNS Melava: राज ठाकरे यांचा आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद; मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन
Raj Thackeray | (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा (Rangsharda) सभागृहात आयोजित मेळाव्यात दुपारी तीन वाजता ते बोलणार आहेत. राज ठाकरे यांनी नुकताच आपला अयोध्या दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांनी पुणे येथील सभेतही त्याबाबत भाष्य केले. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा रद्द करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे सांगितले जात आहे की, वैद्यकीय उपचार घेतल्यावर पुढील काही काळ राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना भेटू शकणार नाहीत. त्यामुळेच ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांनी प्रदीर्घ काळानंतर दाटक्या सभा घेतल्या आहेत. त्याची सुरुवात मुंबईतील शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्याने झाली. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेवर जोरदार टीकास्त्र सुरु झाले. मनसे कार्यकर्तेही संभ्रमात होते. परिणामी राज ठाकरे यांनी ठाणे येथे एक उत्तर सभा घेतली. ठाणे येथील सभेत त्यांनी गुढी पाडवा मेळाव्यातील सभेवेळी केलेल्या भाषणातून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, ', राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांचा थेट निशाणा; फेसबुक पोस्ट चर्चेत)

राज ठाकरे हे केवळ ठाणे येथेच सभा घेऊन थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा अल्पावधीतच औरंगाबद येथेही सभा घेतली. औरंगाबद येथील त्यांची सभा विषेश चर्चेत राहीली. त्यानंतर त्यांनी पुणे येथे सभा घेतली. या सभेतच त्यांनी आगोदरच रद्द केलेल्या अयोध्या दौऱ्याची जाहीर माहिती दिली. हा दौरा आपण तुर्तास रद्द का करतो आहोत हेही सांगितले. अर्थात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित असा शब्दप्रयोग केला. त्यानंतर आता ते आज मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या संवादात ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.