Corona Cases in India: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 8,329 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 4,216 लोकांनी कोरोनावर मात केली आहे आणि 10 लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. अहवालानुसार दिल्ली आणि महाराष्ट्राची आकडेवारी भयावह आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी निर्बंध वाढवले जात आहेत.
देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. आता एकूण सक्रिय प्रकरणे 40,370 वर पोहोचली आहेत. यासह, या आजारामुळे एकूण मृतांची संख्या 5,24,757 वर पोहोचली आहे. (हेही वाचा - Plastic Straw Ban: प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी? केंद्र सरकारचा निर्णय, Amul ने स्ट्रॉच्या वापरासाठी मागितली मुदतवाढ)
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दैनिक सकारात्मकता दर 2.41 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 1.75 टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,26,48,308 झाली आहे, तर मृत्यूदर 1.21 टक्के नोंदवला गेला आहे. दुसरीकडे, कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 194.92 कोटींहून अधिक कोरोना लस देण्यात आल्या आहेत.
#COVID19 | India reports 8,329 fresh cases, 4,216 recoveries, and 10 deaths in the last 24 hours.
Total active cases are 40,370 pic.twitter.com/svqgvbjtpx
— ANI (@ANI) June 11, 2022
गेल्या 24 तासांत देशात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये पाच, दिल्लीतील दोन आणि गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.