Husband Wife Fight: जेवणात केस आल्याने नवऱ्याचा संयम सुटला, पत्नीला मारहाण करून केलं मुंडन
Husband-Wife Fight (PC- Pixabay)

Husband Wife Fight: पती-पत्नीमध्ये भांडण होणे सामान्य गोष्ट आहे. पण उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पिलीभीत जिल्ह्यात जेवण करताना ताटात केस (Hair) आल्याने नवऱ्याचा संयम सुटला. संतापलेल्या पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. एवढ्यावरही नवऱ्याचे समाधान झाले नाही तर त्याने आपल्या पत्नीचे मुंडन केले. पती पत्नीसोबत हे करत असताना घरातील इतर सदस्य हा तमाशा पाहत होते. या घटनेनंतर विवाहितेने आई-वडिलांना फोन केला असता पतीने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या अर्जावरून पोलिसांनी तिचा पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पुरनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दुंडा गावात राहणाऱ्या सीमाने गजरौला पोलिस स्टेशनच्या रिचोला पोलिस चौकीत दिलेल्या अर्जात सांगितले की, त्याच भागातील मिलक गावात राहणाऱ्या जहीरुद्दीनसोबत तिचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. पती जेवत करत असताना जेवणातून एक केस बाहेर आला. यावरून पतीने तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! नवरा तोंडावर थुंकला; पत्नीने कोर्टात दाखल केली याचिका, 28 वर्षांनी झाला घटस्फोट)

यानंतर पतीने तिचे हात-पाय बांधले आणि नंतर तिच्या डोक्याचे केस पूर्णपणे उपटले. यावेळी पतीचा दीर जमरुद्दीन आणि सासू हा सर्व प्रकार पाहात होते. दोघांनीही पतीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तिने आई-वडिलांना फोन केला असता पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच मारहाण केली. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: शेजारणीशी असलेले अवैध संबंध आले मुलासमोर, गुन्हा लपवण्यासाठी बापानेच केली तरुणाची केली हत्या)

त्यानंतर पतीने अधिक हुंड्याची मागणी करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच मुलाला इथे सोडून जा, असेही सांगितले. पीडितेने चौकशीनंतर कारवाईची मागणी केली आहे. या अर्जाच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.