Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात शहीद झालेले भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानगौदार (Naveen Shekharappa) यांचे पार्थिव सोमवारी भारतात आणले जाणार आहे. युक्रेनच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या खार्किवमध्ये सुरू असलेल्या संघर्षात नवीनचा मृत्यू 1 मार्च रोजी झाला होता. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात राहणारा नवीन हा खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह दान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कुटुंबाला 25 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यासोबतच एका सदस्याला नोकरीचे आश्वासन दिले आहे.
खार्किवमध्ये गोळ्या झाडण्यात आलेल्या नवीनचा मृतदेह सोमवारी बेंगळुरूला पोहोचणार आहे. त्याचे वडील शेखरप्पा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'माझ्या मुलाचे पार्थिव 21 तारखेला पहाटे 3 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. तेथून सकाळी 9 वाजता पार्थिव आमच्या गावी येईल. यानंतर आम्ही वीरशैव परंपरेनुसार पूजा करू आणि नंतर मृतदेह लोकांना पाहण्यासाठी ठेवला जाईल आणि त्यानंतर आम्ही एसएस हॉस्पिटल देवनागरी येथे वैद्यकीय अभ्यासासाठी मृतदेह दान करू. (हेही वाचा - Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात, बस पलटी होऊन 8 जण ठार, 20 हून अधिक गंभीर जखमी)
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं की, 'माझ्या मुलाला वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी साध्य करायचे होते, पण तसे झाले नाही. निदान त्याच्या शरीराचा उपयोग इतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासासाठी करता येईल. त्यामुळे घरी आम्ही वैद्यकीय संशोधनासाठी मृतदेह दान करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनचा मृतदेह रविवारी नव्हे तर सोमवारी बेंगळुरू विमानतळावर पोहोचेल.'
नवीनच्या वडिलांनी सांगितले की, “आम्हाला हावेरी जिल्हाधिकार्यांकडून संदेश मिळाला आणि एमिरेट्स फ्लाइट सर्व्हिसकडूनही संदेश मिळाला. आमच्या मुलाचा मृतदेह परत आणल्याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलून कृतज्ञता व्यक्त केली.