Terror Attack in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील बरझुला भागात पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 कर्मचारी जखमी
Terrorists attack police party in Srinagar (Photo Credits: ANI)

Terror Attack in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील बरझुला भागात (Barzulla Area) शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला (Terror Attack) केला. या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बागट बरझुला (Baghat Barzulla) येथे अज्ञात बंदूकधारकांनी सुरक्षा दलावर गोळ्या झाडल्या.

जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. अद्याप अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

पोलिस पक्षावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात एक दहशतवादी एके-47 हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडून आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू आहे. गोळीबारानंतर दहशतवादी त्वरित पळून गेले. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराचे उच्च अधिकारी आणि सैनिक घटनास्थळी दाखल झाले आहेत.