Telangana Farm Loan Waiver: तेलंगना सरकारकडून 31,000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी; काँग्रेस सरकारचा अभूतपूर्व निर्णय
Revanth Reddy (संग्रहित संपादित प्रतिमा)

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. "मंत्रिमंडळाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. मागील सरकारने 10 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 28,000 कोटी रुपयांची शेती कर्जे माफ केली. असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.  पात्रता अटींसह कर्जमाफीचे तपशील नंतर जाहीर केले जातील, रेड्डी म्हणाले की कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 31,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. (हेही वाचा - Ram Temple Chief Priest Laxmikant Dixit Passes Away: राम मंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन)

मागील बीआरएस सरकारनेही अशीच एक योजना जाहीर केली होती ज्याचा खर्च राज्याच्या तिजोरीवर 28,000 कोटी रुपये होता. "सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मागील सरकारने दहा वर्षे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नाही. आमचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर आठ महिन्यांत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करत आहे," असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळ उपसमिती राजकीय पक्ष आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करेल आणि 15 जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या निर्णयाला "ऐतिहासिक" म्हणत राहुल गांधी म्हणाले की, 'किसान न्याय' (शेतकरी न्याय) चा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.