जाणून घ्या Masked Aadhar नक्की काय आहे?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

भारतात जवळजवळ 100 करोड लोकांकडे त्यांचे भारतीयत्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले आहे. तसेच आधार कार्ड हे आता सर्व ठिकाणी कामांकरिता ही लागू केले आहे. तर आधार कार्डची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यामध्ये नवे फीचर्स आणले जातात. त्यामुळे आधार कार्डने त्याचे नवीन फीचर असलेले Masked Aadhar आणले आहे.

काही दिवसांपूर्वीच आधार कार्डने त्याचे नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरच्या मास्क आधार कार्डच्या सहाय्याने त्यावरील क्रमांक लपवू शकतात. तसेच कार्डवरील 12 क्रमांकांपैकी सुरुवातीचे 8 क्रमांक या फीचरद्वारे लपवता येणार आहे. तर हे नवीन फीचर्स असलेले मास्क आधार वैध मानले जाणार आहे. तर या आधार कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Maskesd Aadhar मिळवण्यासाठी पुढील सूचनांकडे लक्ष द्या.

1. uidai.gov.in या संकेतस्थळावर हे मास्क आधारकार्डची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

2. Aadhar Enrolment या सेक्शनला जाऊन तेथे दिलेल्या डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करणे

3.त्यानंतर e-Aadhar मिळविण्यासाठी आधार कार्ड, व्यर्च्युअल आधार कार्ड किंवा एनरोलमेंट आयडीचा उपयोग करावा.

4.तसेच फॉर्मचे रजिस्ट्रेशन करताना वरील बाजूस एक सामान्य आधार आणि मास्क आधार असे दोन ऑप्शन दिसतील. त्यावेळी मास्क आधारवर क्लिक करावे.

5. हे सर्व झाल्यानंतर आधार कार्ड, व्यर्च्युअल आधार कार्ड किंवा एनरोलमेंट आयडीचा क्रमांक टाकावा.

6. आपले नाव, पिन कोड, पासवर्ड टाकल्यानंतर एक OTP येईल.

7. OTP कोड आल्यानंतर हे Masked Aadhar डाऊनलोड करता येईल.