क्रूरतेचा कळस: टीव्ही पाहते म्हणून आईने पोटच्या 5 वर्षाच्या मुलीची केली हत्या; बेल्टने मारून केले होते उन्हात उभे
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

स्वतःच्या रागावर ताबा न ठेऊ शकणारी आई, आपल्या पोटच्या मुलीला शिक्षा देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते याचे एक उदाहरण तामिळनाडू (TamilNadu) येथे घडले आहे. तमिळनाडुच्या तिरुचिराप्पल्ली (Trichy) येथे एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला इतकी मारहाण केली की, शेवटी तिचा मृत्यु झाला. या मुलीची चुक म्हणजे ही मुलगी बऱ्याच वेळापासून टीव्ही पाहत होती. मृत मुलीचे नाव पी. लतिका श्री होते, ती पांडियन (37) आणि निथिया कमलम (35) यांचे एकुलती एक मुलगी होती. साध्य पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ही मुलगी सतत टीव्ही पाहत होती. हे पाहून तिच्या आईला प्रचंड राग आला अणि तिचा स्वतःवरील ताबा सुटला. रागाच्या भरात या आईने आपल्या एकुलत्या एक मुलीला बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तिचा राग शांत झाला नाही, त्यानंतर तिने या मुलीला बाहेर कडक उन्हात उभे केले. अखेर तिथेच ही मुलगी बेशुद्ध झाली. (हेही वाचा: जास्त पोटगी मिळावी म्हणून आईने केली 3 वर्षाच्या मुलाला नग्न करून अमानुष मारहाण; पतीला व्हिडिओ पाठवला)

लतिका बेशुद्ध झाल्यानंतर, तिच्या वडिलांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मुलीची तब्येत इतकी खराब झाली होती की तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला सलेम जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अखेर हॉस्पिटलमध्ये मुलीला मृत घोषित  करण्यात आले आणि रात्री पोस्टमॉर्टमसाठी पाठवले गेले. पोलिस आता मुलीच्या पालकांची चौकशी करीत आहेत, त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.