sikkim flash flood

Sikkim Flash Flood:  सिक्कीम राज्यात अचानक ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  परिसरातील अनेक लोक अडकले आहे. अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. यात भरपूर नुकसान झाल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. ढगफुटी झाल्याने भीषण पूर आला आहे. मंगळवारी अचनाक ढगफूटी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या पूरात तीन दिवसांत १८ जणांनी जीव गमावला आहे. तर ९८ बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य सरकारने बुधवारी (4 ऑक्टोबर) केंद्र सरकारला याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या पूरात ३००० लोक अडकले आहे. मंगन जिल्ह्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार काल रात्री चुंगथांगशी संपर्क साधू शकले. संपूर्ण शहर गाळाने भरलेले आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे त्यांनी शहर साफ करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. आतापर्यंत, चुंगथांग शहरातून कोणीही बेपत्ता झाल्याचे वृत्त नाही.परंतु नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.लोकांना बीओपी परिसरात हलवण्यात आले आहे.आज हेलिकॉप्टरने लाचुंगला जाऊन चुंगथांगला उतरायचे होते.परंतु हवामानामुळे, हेलिकॉप्टर येणार नाही.म्हणून, आम्ही पायी एक टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे...एक टीम आज चुंगथांगला पोहोचेल आणि वास्तविक परिस्थितीचा अंदाज घेईल...चुंगथांगमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विविध भागातून लोक बेपत्ता असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु आमच्याकडे कोणाचाही जीव गेल्याचे कोणतेही वृत्त नाही. मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे."

 बचाव कार्यांच्या समोर मोठे आवाहनाचे कामा आहे. ती अशा ठिकाणी जात आहे ज्याबद्दल तिला काहीच माहिती नाही. टीम पूर्णपणे अज्ञात आहे. पूरामुळे शहरातील संपर्क तुटले आहे. सेल टॉवर, रस्ते, पूर संपुर्ण शहर पाण्याखाली गेले आहे.