खुशखबर : SBI देत आहे 5 लिटर पेट्रोल मोफत प्राप्त करण्याची संधी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पुन्हा एकदा ग्राहकांसाठी पेट्रोलची ऑफर घेऊन आली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) च्या कुठल्याही रिटेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर, भीम अॅपचा उपयोग करून पैसे भरले तर, 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे. एसबीआयची ही ऑफर 19 ते 23 नोव्हेंबर पर्यंत चालू होती. मात्र आता ग्राहकांचा प्रतिसाद पाहता बँकेने या ऑफरचा कालावधी वाढवून तो 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहक आता 15 डिसेंबरपर्यंत मोफत 5 लिटर पेट्रोल मिळवू शकतात.

यासाठी ग्राहकांना कमीतकमी 100 रुपयांचे पेट्रोल भरणे गरजेचे आहे. त्यानंतर भीम अॅपद्वारे या पेट्रोलचे पैसे भरायचे आहेत. झालेल्या व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. फक्त या एसएमएससाठीचा खर्च ग्राहकांना करावा लागणार आहे. त्यानंतर जर तुमचा नंबर लकी ड्रॉ मध्ये लकी ठरला तर तुम्हाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. याबाबत कोणतीही शंका असल्यास कस्टमर केअरशी संपर्क करण्यासाठी तुम्ही टोल फ्री नंबर 1800 22 8888 चा वापर करू शकता. तसेच help@xtrarewards.com या आयडीवर मेलदेखील पाठवू शकता.