MDH मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटीचे निधनाची बातमी केवळ अफवा !
महाशय धर्मपाल गुलाटी (Photo Credits: Twitter)

MDH या प्रसिद्ध मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे दिल्ली मध्ये निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी महाशय धर्मपाल गुलाटी यांनी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अशा बातम्या सकाळपासून सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. मात्र या केवळ अफवा आहेत.   MDH च्या टेलिव्हिजन वरील जाहिरातींमधून गुलाटी घराघरात पोहचले होते.

खास व्हिडीओ केला शेअर

महाशय धर्मपाल गुलाटी ठणठणीत असल्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सोशल मीडियावरील पसरत असलेलं वृत्त . खोटं असल्याचं सांगण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये महाशय धर्मपाल गुलाटी कीर्ती नगरमधील त्यांच्या ऑफिसमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

महाशय धर्मपाल गुलाटी हे भारत -पाक फाळणीनंतर भारतामध्ये आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. हळूहळू त्यांचा मसाल्याचा धंदा स्थिरावला. बघता बघता MDH मसाले एक ब्रँड झाला. ते जगभर प्रसिद्ध झाले आहेत.

१९५९ साली दिल्लीच्या कीर्ती नगर परिसरात त्यांची मसाला दळण्याची फॅक्ट्री होती. हळूहळू लोकांना या मसाल्याची चव आवडायला लागली. आज त्यांच्या देशभरात १५ फॅक्ट्रीचे सेट्स आहेत.