Elvish Yadav : रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश यादव प्रकाश झोतात आला आहे. पोलिसांनी एल्विश यादवच्या एफआयआरमध्ये एनडीपीएसच्या सहा कलमांपैकी जी कलमे (Snake Venom Cas)जोडली होती, त्यापैकी दोन कलमे न्यायालयाने फेटाळून लावली आहेत. आता एल्विशवर एनडीपीएस (NDPS) चे फक्त चार कलम लागू होतील. सुरजपूरच्या जिल्हा न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वकिलांच्या संपामुळे एल्विश यादवच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. (हेही वाचा : Elvish Yadav Rave Party Case: एल्विश यादव प्रकरणात पोलीस स्टेशन प्रभारीवर मोठी कारवाई, निष्काळजीपणाचा आरोप)

आज गुरुवारी एल्विश यादवचे वकील जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. एल्विश यादवच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, त्यांनी एनडीपीएसची अनेक कलमे जोडली आहेत. यानंतर एल्विश यादवच्या आधीच दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने नवीन याचिका दाखल करावी, असे सांगितले. पोलिसांनी एफआयआरमध्ये ज्या कलमांमध्ये वाढ केली होती, त्यात न्यायालयाने एनडीपीएस कायद्याचे कलम ८/२२/२९/३०/३२ स्वीकारले आहे. न्यायालयाने कलम २७/२७अ काढून टाकले आहे. (हेही वाचा :Elvish Yadav Drugs Case: 'वर्षा'वर एल्विश यादवच्या हस्ते आरती; गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाची स्क्रिनिंग करणे शक्य नसल्याचे दिपक केसरकरांचे मत )

गेल्या 4 दिवसांपासून एल्विश यादव तुरुंगात आहे. आज (गुरुवारी) त्याचे वकील न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल करू शकतात. त्यावर सुनावणीही पार पजण्याची शक्यता आहे. बुधवारी पोलिसांनी ईश्वर आणि विनयला एल्विश प्रकरणातच अटक केली होती. त्यापैकी एक एल्विशचा मित्र आहे आणि दुसरा विषारी साप प्रोवाइड करणाऱ्याच्या संपर्कात असतो.