Photo Credit : Pixabay

Ramadan 2025 Date in India: रमजानचा पवित्र महिना 2 मार्च 2025, रविवारपासून सुरू होणार आहे. जामा मशीद प्रशासन आणि लखनऊच्या शाही इमामांनी ही घोषणा केली. दुसरीकडे, सौदी अरेबियामध्ये 28 फेब्रुवारी रोजी चंद्र दिसला, म्हणजेच 1 मार्च 2025 रोजी तेथे रमजान सुरू होईल. रमजान मध्ये इस्लामी कॅलेंडरच्या नवव्या महिन्याची सुरुवात होते आणि पहाट ते सूर्यास्तादरम्यान 29 ते 30 दिवसांच्या उपवासाचा कालावधी सुरू होतो.  रमजान 2025 चा चंद्र 28 फेब्रुवारी 2025 रोजी जगातील काही भागात दिसण्याची शक्यता होती, त्यानंतर सौदी अरेबियासह जगातील अनेक भागात रमजान 2025 चा चंद्र दिसला आहे. रमजानचा पहिला उपवास आज, शनिवार, 1 मार्च 2025 रोजी पासून सुरु झाला आहे.

भारतात कधीपासून सुरु होणार, रमजान महिना 

28 फेब्रुवारीला भारतात चंद्र दिसला नाही, त्यामुळे रमजानचा पवित्र महिना २ मार्चपासून सुरू होणार आहे.  लखनऊच्या शिया मरकजी चंद समितीचे अध्यक्ष सैफ अब्बास नक्वी यांनी सांगितले की, आज 29 शाबान 1446 हिजरी हिजरी रमजानचा चंद्र दिसला नाही आणि रमजानची पहिली तारीख 2 मार्च 2025 असेल. हा महिना देवाची प्रार्थना करण्याची आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचे शिकवतो. मुस्लिम बांधव या महिन्यात सुहूर ते इफ्तार पर्यंत उपवास करतात आणि अल्लाहची प्रार्थना करतात.