शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dasara Melava) याचं नात अतुट आहे. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक शिवसेना मेळावे गाजवले. पण दीड वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि आता दोन शिवसेना मेळावे घेतले जातात. पण दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क कुणाच्या पारड्यात पडणार यासाठी पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात संघर्ष सुरू होता. पण आता शिंदे गटाने आपण शिवाजी पार्कसाठी केलेला दावा सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्याबाबतचं ट्वीट करत माहिती दिली आहे.
ठाकरे गटाने महिनाभर आधीच यंदा शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता. त्यामुळे आता त्यांच्यासाठी मार्ग मोकळा असेल का? हा प्रश्न कायम आहे. अद्याप त्यांना पालिकेकडून मंजुरीचं पत्र देण्यात आलेलं नाही. मागील वर्षीही ठाकरे गटाने शिवाजी पार्क वर आणि शिंदे गटाने बीकेसी च्या मैदानावर एकाच वेळी दसरा मेळावा घेतला होता.
पहा ट्वीट
दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण !
शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो.
माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.
यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून…
— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 10, 2023
यंदा दसरा अर्थात विजयादशमी 24 ऑक्टोबर दिवशी आहे. शिंदे गट आता यंदाचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेता येईल का? याची चाचपणी करत आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. MLAs Disqualification Case In Maharashtra: सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी .
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव, चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. पण आमदार अपात्रतेची कारवाई अद्यापही सार्यांवर टांगती आहे.