Sanjay Raut On Owaisi: संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत त्याठिकाणी नतमस्तक झाले होते. अकबरुद्दीन ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधताना यावर तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्राला खिजवणाऱ्या आणि राजकारण करू पाहणाऱ्या त्याच्या भक्तांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत पुढे म्हणाले मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांना बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे. महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंत औरंगजेब 25 वर्षे लढत राहिला. तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले. (हे देखील वाचा: Sharad Pawar On Pakistan: शरद पवारांचा पाकिस्तानसाठी रोष, शत्रू देशाच्या जनतेसाठी केल असं वक्तव्य)

क्रेंदावर टीका

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही काश्मिरी पंडित परतत नाहीत आणि काश्मीरमध्ये राहणारे सुरक्षित नाहीत. जम्मू-काश्मीरमधील अस्थिरतेचे वातावरण संपवण्यासाठी तुम्हाला (केंद्राला) कठोर निर्णय घ्यावे लागतील असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहतोय, पण केंद्र सरकार काय करतेय? या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता आहे या दोघांनी केंद्रीय राजकारण बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे.