Deepak Kesarkar: तुम्ही अजून लहान आहात, प्रादेशिक अस्मिता काय असते तुम्हाला कल्पना नाही; दिपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
Deepak Kesarkar (Photo Credit - Twitter)

राज्यात गेले काही दिवसात सत्ताधारी विरुध्द विरोधक यापेक्षा शिवसेना (Shiv Sena) विरुध्द शिवसेना हा सामना अधिक बघायला मिळत आहे. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची शिवसेना खोटी यांवर जोरदार चर्चा रंगली आहे.  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या शिवसंवाद यात्रा (Shiv Sanwad Yatra) करत आहेत. युवा सेनेचा त्यांच्या या दौऱ्याला उत्सफूर्त प्रतिसादा मिळताना दिसत आहे तरी शिंदे गटाकडून आदित्यच्या या दौऱ्यावर टीका होत आहे. तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला कल्पना नाही, प्रादेशिक अस्मिता काय असते, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

 

राज्यातील सत्तासंघार्षानंतर आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा काढत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण हा या यात्रेमागचा हेतू आहे.  21 ते 23 जुलै या दरम्यान आदित्य भिवंडी (Bhiwandi), नाशिक (Nashik), दिंडोरी (Dindori), संभाजीनगर (Sambhaji Nagar) आणि शिर्डी (Shirdi) येथे भेट देणार आहेत. तरी आदित्यच्या या यात्रेवर शिंदे गटाकडून विविध प्रतिक्रीया येताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे पाठोपाठ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती संजय राऊत(Sanjay Raut) यांनी दिली आहे. तरी ठाकरे कुटुंबियांच्या या दौऱ्यावर शिंदे सरकार काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाच ठरणार आहे. (हे ही वाचा:-Aaditya Thackeray Vs Suhas Kande: 'गद्दाराला उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध नाही' म्हणत सुहास कांदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र)

 

पत्रकार परिषदेदरम्यान दिपक केसरकर म्हणालेत ही शिवसंवाद यात्रा किंवा महाराष्ट्र दौरा काढणं म्हणजे केवळ लोकांची दिशाभूल करणं होय, झालं गेल सगळं सावरण्यासाठी तुम्ही ही यात्रा काढत आहात, सत्तेत असताना अशी यात्रा काढत शिवसैनिकांची भेट का नाही घेतली असा थेट सवाल विचारत दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेवर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला वाटतं हे सगळे कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढताय, सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका. आदराने आम्ही बोलतो तुम्ही पण आदराने बोलवा, तुम्ही एका भूमिकेसोबत राहा. असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंसह उध्दव ठाकरेंना दिला आहे.