Ajit pawar And Bachchu kadu (photo credit- FB)

Maharashtra Political Crisis: राज्यात राजकिय भुंकप झाल्यामुळे राज्यात सर्वींकडे चर्चा चालू झाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक झालेल्या ह्या शपथविधी मुळे राज्यात चांगलीच राजकिय चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) 9 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादीचा गट शिंदे आणि भाजप यांच्या राज्य सरकार  गटात सामील झाला आणि सत्तेत सामील झाला. परिणामी राष्ट्रवादी गटाला शिंदे गटात सामील केल्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बऱ्याच महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचे काम रखडले असताना, दरम्यान अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथविधी सोहळा 2 जुलै रोजी पार पाडला.  राज्य सरकारच्या शिंदे गटात नागाजी असल्याच्या चर्चा सगळीकडे चालू आहेत. शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडूंनी माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

 शिंदे आणि फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ अजित पवारांना पडली. अशी नाराजी बच्चू कडूंनी माध्यमांसमोर मांडली. जे शेवटी आले, त्यांना आधी जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार काय माहीत?  नाराज कुणी असेल तर माहीत नाही, पण आता नाराजी करून काही होणार नाही. फक्त त्यांना नाराज करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे”, असं बच्चू कडूंनी यावेळी सांगितले.