Imtiaz Jalil | (PC - Facebook)

आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादसह (Aurangabad) उस्मानाबादचे (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचं नाव धाराशीव (Dharashiv) करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा हा निर्णय  यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. पण ती बैठक बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो निर्णय अवैध असल्याचं सांगत आज पुन्हा औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

 

शिंदे सरकराने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयावर औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी टीका केली आहे. जलील म्हणाले, शिवसेना (Shiv Sena) असो वा भाजप (BJP) स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला जात आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजींचं नाव हे त्याचाचं एक उदाहरण आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाला सुद्धा औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय घ्यायचे होते, म्हणून नामांतराचा मुद्दा पुढे केला जात आहे. पाणी टंचाई, बेरोजगारी सारखे मोठे प्रश्न औरंगाबादच्या उंबरठ्यावर असताना नामांतराचा प्रश्न सोडवन खरंच महत्वाचं आहे का असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. (हे ही वाचा:-Aurangabad renamed Sambhaji Nagar : औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च : एम्तियाज जलिल)

 

तसेच औरंगाबादच्या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण आधार कार्ड (AAdhar Card), पॅन कार्डसह (Pan Card) इतर महत्वाच्या कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे. तसेच या सगळ्यासाठी येणारा खर्च कोण देणार आहे, असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी सरकारला लगावला आहे. औरंगाबादला विकासाची गरज आहे नामांतराची नाही असं स्पष्ट मत औरंगाबादचे खासदार एम्तियाज जलिल यांनी व्यक्त केलं आहे.