महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना-भाजप यांची युती तुटल्यानंतर महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार येणार, असे वातावरण निर्माण झाले असून केवळ सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागल होते. यावर गुरुवारी सोनिया गांधी यांनी सत्तास्थापनेबाबत संमती दर्शवली. यामुळे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. आज, शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत तिन्ही पक्षांचा संयुक्त किमान समान कार्यक्रम, मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ, प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या, विधानसभाध्यक्ष, उपमुख्यमंत्रिपद, खात्यांची वाटणी, संभाव्य आघाडीचे नाव यासह विविध मुद्यांवर शिक्कामोर्तब होऊन सरकार स्थापनेविषयी घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण पाहायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जनेतेने भाजप-शिवसेना पक्षाला कौल दिलानंतरही मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. भाजप- शिवसेना पक्षाची युती तुटल्यानंतर राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल, असे प्रश्न अनेकांना पडले होते. दिल्लीतील गुरुवारी दुपारपर्यंतच्या घडामोडींनंतर सरकार स्थापनेविषयीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार,अशा चर्चांना उधाण आले आहे. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पूर्ण 5 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील, असा 'फॉर्म्युला' ठरल्याचेही सूत्रांनी सांगितले. हे देखील वाचा-'मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही'- संजय राऊत
नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अगामी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर घेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले. दरम्यान, संजय राऊत यांनी सेनेचे युवानेत अदित्य ठाकरे यांचे नाव घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराजमान व्हावे असे, महाराष्ट्रातील जनेतेची हाक आहे, असेही संजय राऊत त्यावेळी म्हणाले आहेत.