PM Narendra Modi (PC - ANI)

Aero India 2023: एरो इंडियाच्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रविवारी संध्याकाळी बेंगळुरू (Bengaluru) मध्ये दाखल झाले. पाच दिवसीय एरो इंडिया 2023 चे उद्घाटन सोमवारी होणार आहे. अनेक मेड-इन-इंडिया संरक्षण उत्पादने (Made-in-India Defense Products) येथे प्रदर्शित केली जातील. एचएएल विमानतळावर (HAL Airport) राज्यपाल थावरचंद गेहलोत (Governor Thaawarchand Gehlot) आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

या कंपन्या भाग घेत आहेत

प्रमुख प्रदर्शकांमध्ये एयरबस, बोइंग, डसॉल्ट एविएशन, लॉकहीड मार्टिन, इजरायल एयरोस्पेस इंडस्ट्री, ब्रह्मोस एयरोस्पेस, आर्मी एविएशन, एचसी रोबोटिक्स, SAAB, सफरान, रोल्स रॉयस, लार्सन एंड टुब्रो, भारत फोर्ज लिमिटेड, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि बीईएमएल लिमिटेड यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Air Asia Flight Tyre Cracked: विमानाचा टायर चिरला, डीसीजीएकडून एअर एशियाचे विमान पुणे येथे लँड)

पाचव्या पिढीतील प्रगत मध्यम लढाऊ विमाने, LCA Mark2 आणि नेव्हल ट्विन इंजिन डेक-आधारित लढाऊ विमानांसह भारताच्या भावी स्वदेशी विमानांचे मॉडेल प्रदर्शनात असतील. सर्व विमाने विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. एरो इंडियाच्या इंडिया पॅव्हेलियनच्या बाहेर, भारतीय लष्कराच्या रंगात बनवलेल्या मेड-इन-इंडिया लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) प्रचंडचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील. यंदाच्या एरो शोमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हेलिकॉप्टरने उड्डाण करणार आहेत. एलसीएचचा गेल्या वर्षी संरक्षण दलात समावेश करण्यात आला होता.

Aero India मध्ये 32 देशांचे संरक्षण मंत्र्यांचा समावेश -

एका अधिकृत निवेदनानुसार, यावेळी एरो इंडिया-2023 चा फोकस स्वदेशी उपकरणे/तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' व्हिजनच्या अनुषंगाने विदेशी कंपन्यांशी भागीदारी करण्यावर असेल. यावेळी 98 देश, 32 देशांचे संरक्षण मंत्री, 29 देशांचे हवाई दल प्रमुख आणि जागतिक आणि भारतीय मूळ उपकरणे उत्पादक कंपन्यांचे 73 मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.