Petrol-Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 30 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 99 रुपये 41 पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर 90 रुपये 77 पैशांवर पोहोचला आहे. रविवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 50 पैसे आणि 55 पैशांनी वाढ झाली होती.
चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर, गेल्या आठवड्यात मंगळवारी या किमतींमध्ये प्रथमच बदल करण्यात आला. त्यानंतर गेल्या 7 दिवसांत इंधन सहाव्यांदा महागले आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 114 रुपये 19 पैशांनी तर डिझेलचा दर 98 रुपये 50 पैशांनी वाढला आहे. येथे पेट्रोलच्या दरात 31 पैशांनी तर डिझेलच्या दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे. अलिकडे कच्च्या तेलाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. (हेही वाचा - Bharat Bandh 2022: 28 आणि 29 मार्च रोजी भारत बंद, बँकिंग आणि वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता)
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून ते मंगळवारपर्यंत इंधनाचे दर स्थिर होते. या दरम्यान केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपये प्रति लिटरने कमी केले होते. OMC विविध घटकांच्या आधारे वाहतूक इंधन खर्चात बदल करतात. अंतिम किंमतीत उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर आणि डीलरचे कमिशन समाविष्ट आहे.
दरम्यान, रशियावरील सध्याच्या निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल आणि वाढीवर परिणाम होईल अशी भीती आहे. कच्च्या तेलाची किंमत मर्यादा भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण यामुळे पेट्रोल आणि डिझेल 15 ते 25 रुपयांनी महाग होऊ शकतात. सध्या भारत आपल्या गरजेपैकी 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो.