CAA: पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील निर्वासित हे आज आक्रमक झाल्याचे दिसेल. नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलबजावणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावेळी त्यांनी बॅरिकेड्स तोडले. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या अंमलबजावणी विरोधात केल्या जाणाऱ्या विधानांवरून इंडीया आघाडी (India Alliance) आणि काँग्रेस(Congress) नेत्यांनी काही विरोधात्मक विधाने केली होती. त्या विरोधातच निर्वासीतांनी निदर्शने केली. या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीएएमुळे भारताशेजारील तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यापैकी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान हे तिनही देश मुस्लिम बहुसंख्य राष्ट्र आहेत.(हेही वाचा: Amit Shah On CAA: सीएए कुठल्याही परिस्थिती मध्ये मागे घेतला जाणार नाही - अमित शाह यांनी केलं स्पष्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)