कोरोना देवाची करणी असेल, तर 2019-20 मधील अर्थव्यवस्थेच्या अयोग्य व्यवस्थापनाचे वर्णन कसं कराल? पी. चिदंबरम यांचा निर्मला सीतारामन यांना सवाल
पी. चिदंबरम (Photo Credits: PTI)

अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी जीएसटी कौन्सिलची बैठक झाल्यानंतर कोरोना ही देवाची करणी असून जीएसटी कलेक्शनवर परिणाम करणारी एक अदृश्य घटक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सितारामन यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सितारामन यांना सवाल केला आहे.

या ट्विटमध्ये पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे की, 'जर ही महामारी देवाची करणी आहे, तर 2017-18, 2018-19 आणि 2019-20 यादरम्यानच्या अर्थव्यवस्थेच्या अयोग्य व्यवस्थापनाचं वर्णन कसं कराल? अर्थमंत्री ‘मेसेंजर ऑफ गॉड’ याचं उत्तर देतील का?, असा प्रश्न चिदंबरम यांनी सितारामन यांना केला आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 34 कोटींचा टप्पा; 76,472 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह 1,021 मृत्यू)

केंद्र सरकार आर्थिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळत आहेत. हा विश्वासघात आणि कायद्याचं उल्लंघन आहे. दुसर्‍या पर्यायांतर्गत राज्यांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्यास सांगितलं जातं. हे केवळ वेगळ्या नावाने दिलं जाणारं कर्ज आहे. या कर्जानंतर सर्व आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडतो. जीएसटी भरपाईतील तूट भरून काढण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना दोन पर्याय दिले आहेत, मात्र ते स्वीकारायला नकोचं, असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जीएसटी कौन्सिलची बैठक झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कोरोना ही देवाची करणी' आणि जीएसटी कलेक्शनवर परिणाम करणारा एक अदृश्य घटक असल्याचं म्हटलं होतं. देवाच्या करणीला आपण सामोर जात आहोत. त्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत काहीशी मंदीही पाहायला मिळू शकते, असंही सितारामन यावेळी म्हणाल्या होत्या.