Republic Day Sale 2019: ग्राहकांची चांदी; ऑनलाईन शॉपिंग कंपन्या देत आहेत 'छप्पर फाड के' सूट आणि सवलती
प्रजासत्ताक दिन सेल (File Photo)

शॉपिंग लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. येणारा प्रजासत्ताक दिन (Republic Day) डोळ्यासमोर ठेऊन अनेक ई कॉमर्स कंपन्यांनी भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत. घरातल्या नेहमीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन्स अशा सर्व प्रकारच्या वस्तूंवर छप्पर फाड के सूट आणि सवलती मिळत आहेत. यात आघाडीवर आहे अमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि पेटीएम (Paytm) या तीनही कंपन्यांनी बाजारात आपला असलेला दबदबा कायम ठेवला आहे. अमेझॉनने त्यांच्या सेल 20 तारखेपासूनच सुरु केला आहे. आता ऑनलाईन कंपन्या इतकी सूट देत असल्याने बाजारात जाऊन खरेदीचा प्रश्नच येत नाही. तरीही तुम्हाला स्वतः वस्तू पाहून खरेदी करायची असेल तर बिग बझार (Big Bazaar) चाही सेल सुरु होणार आहे. यामध्ये जवळजवळ अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू उपलब्ध असणार आहेत. पाहूयात काय आहेत हे सेल.

अमेझॉन – अमेझॉनचा सेल 20 ते 23 जानेवारी दरम्यान चालणार आहे. या सेलमध्ये एचडीएफसी बँके (HDFC Bank) च्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMI वर 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. या सेलमध्ये तब्बल 10 करोड प्रोडक्ट्सवर कोणताही EMI लागू असणार नाही. फॅशन विभागातील गोष्टींवर तब्बल 80 टक्के सूट मिळणार आहे. पुरुषांच्या 25,000 पेक्षा जास्त गोष्टींवर ही सूट मिळणार आहे. महिलांसाठीही 20,000 पेक्षा जास्त गोष्टीवर सूट मिळेल. यासोबत इतर 30,000 गोष्टींवर 60 टक्के सूट मिळणार आहे.

या ऑफरमध्ये वनप्लस 6T, शाओमी रेडमी Y2, हुआई नोवा 3i, ओनर 8X, व्हीवो V9 आणि आयफोन X सोबत इतर अनेक फोन शामिल आहेत.  शिवाय, लॅपटॉप, हेडफोन, हार्ड ड्राइव्ह आणि कॅमेरासोबत इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींवर 60 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळेल.

टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर 60 टक्के सूट मिळेल. ठरवीक टिव्हीवर 40, 000 हजारपर्यंत सूट मिळू शकते, तर वॉशिंग मशीनवर 8000 पर्यंत सूट मिळू शकते.

फ्लिपकार्ट - 20 जानेवारीपासून फ्लिपकार्टच्या सेलची सुरुवात झाली आहे. हा सेल फक्त दोन दिवस ठेवण्यात आला आहे, म्हणजे जानेवारी 20 ते जानेवारी 22 पर्यंत. या सेल दरम्यान, ग्राहकांना मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या ब्लॉकबस्टर डील प्राप्त होणार आहेत. तसेच यामध्ये तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे 10 टक्के सवलत मिळवू शकता. एवढेच नाही तर अनेक वस्तूंवर एक्सचेंज ऑफर आणि व्याज नसलेली इएमआय सुविधा देखील उपलब्ध आहे.

बिग बझार - बिग बाजारतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी ‘सबसे सस्ते 5 दिन’ योजनेचे आयोजन करण्यात आले आहें. दि. 23 ते 27 जानेवारीदरम्यान देशातील सर्व बिग बाजार दालनात मिळणार्‍या या ऑफरमध्ये ग्राहकांना त्याच्या ‘रुपेकार्ड’द्वारे 500 रुपयांच्या खरेदीवर 7 टक्के अधिक डिस्काऊंट तसेच 5 हजारांच्या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे. शिवाय महिला, पुरुषांची तसेच बालकांच्या कपडे खरेदीवर 50 टक्के सूट शिवाय कॅशबॅक फर्निचर उत्पादनांवर 60 टक्क्यांपर्यंत सूट, तसेच 20 टक्के अतिरिक्त कॅशबॅक, सुटकेस, ट्रॉलीच्या काही ठरावीक श्रेणीवर 60 टक्के डिस्काऊंट तसेच 20 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

पेटीएम मॉल - फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडियाला टक्कर देण्यासाठी, पेटीएम मॉलनेदेखील प्रजासत्ताक सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 21 ते 26 जानेवारी दरम्यान चालणारा आहे. पेटीएम मॉलच्या या सहा दिवसांच्या सेलमध्ये जवळजवळ सर्व वस्तूंवर सवलत प्राप्त होणार आहे. या ऑफरमध्ये आयफोनचे अनेक मॉडेल समाविष्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तूंवर कॅशबॅकवरदेखील सवलत दिली जाणार आहे. या सेलमध्ये व्याज नसलेली इएमआय सुविधादेखील उपलब्ध आहे.