Cheetah Oban (PC- ANI)

Kuno National Park: श्योपूरच्या (Sheopur) कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मधून पळालेला ओबान चित्ता (Oban Cheetah) तब्बल सहा दिवसांनी पकडण्यात आला आहे. गुरुवारी एका निवासी भागात ओबान दिसला. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळीच दक्षिण आफ्रिकेच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडले. ही टीम ओबानसोबत श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये गेली आहे. सध्या आशा नावाची मादी चिता फरार आहे.

ओबानला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वास्तविक, सहा दिवसांपूर्वी कुनो नॅशनल पार्कमधून ओबान नावाचा नर चित्ता पळून गेला होता, जो गेल्या तीन दिवसांपासून शिवपुरी जिल्ह्यातील बैराड तहसील परिसरातील जंगलाला लागून असलेल्या निवासी भागात फिरत होता. गुरुवारी सायंकाळी दक्षिण आफ्रिकेच्या विशेष पथकाने बैराड तहसील परिसरातील डबरपुरा गावच्या जंगलातून त्याची सुटका करून पकडले. (हेही वाचा - 'बॉयफ्रेंड' Oban अभयारण्य सोडल्यानंतर Cheetah आशा Kuno National Park मधून पडली बाहेर, शोध सुरू)

ओबान उद्यानाच्या हद्दीतून बाहेर येताच कुनो नॅशनल पार्कची टीम चित्त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून होती. यासोबतच गेल्या तीन दिवसांपासून पोहरी वनविभाग आणि पोलिसांचे पथकही चित्याच्या संरक्षणात तैनात होते. गुरुवारी सकाळी गाझीगड गावातील जंगलातून चित्ता बाहेर आला आणि डबरपुरा गावातील जंगलात पोहोचला. बुधवारी ओबानने जौराई गावच्या जंगलात चितळची शिकारही केली होती.

मादी चिता आशा अजूनही फरार -

ओबानला पकडण्यात यश आलं असलं तरी अद्याप मादी चिता आशा अजूनही फरार आहे. मादी चित्ता आशा गेल्या चार दिवसांपासून कुनो नॅशनल पार्कच्या बाहेर असून, तिच्यावर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. कुनोच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या वीरपूर परिसरातील प्रसिद्ध धौरेत सरकार मंदिराच्या जंगलात गुरुवारी आशा दिसली होती.