वाहनाची विक्री आणि नोंदणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निकाल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

गाड्यांच्या विक्रीबाबत सुप्रीम कोर्टाकडून एक महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. 1 April, 2020 नंतर  BS-IV या वाहनाची विक्री आणि नोंदणी भारतामध्ये होणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच कोर्टाने बीएस-3 वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर सुप्रीमकोर्टाचा हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे.

वाहनातून होणारे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी बीएसईएसची रचना करण्यात आली. ऑक्टोबर 2010 मध्ये देशात बीएस-3 लागू करण्यात आला. यानंतर देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये एप्रिल 2010 पासून बीएस-4 लागू झाला. मात्र संपूर्ण देशात बीएस-4 2017 पासून लागू करण्यात आला. 2020 पासून संपूर्ण देशात बीएस-5 ऐवजी बीएस-6 लागू केला जाईल, अशी घोषणा सरकारनं 2016 मध्ये केली होती. त्यामुळे आता बीएस-4 वाहनाच्या विक्रीवर न्यायालयाने बंदी घातली आहे.