Kamala Harris, Nirmala Sitharaman (PC - Facebook)

Forbes Most Powerful Women: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांनी फोर्ब्स (Forbes) च्या 19 व्या वार्षिक शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्सने मंगळवारी 2022 मधील जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी (World's 100 Most Powerful Women List) जाहीर केली. ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 36व्या क्रमांकावर आहेत. तर हॅरिस तिसऱ्या स्थानावर आहे. वृत्तानुसार, निर्मला सीतारामन यांनी या यादीत स्थान मिळवण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे.

अहवालानुसार, कमला हॅरिस व्यतिरिक्त, ग्लोबल टीव्ही हेड बेला बाजारिया या यादीत आणखी एक भारतीय-अमेरिकन आहेत. ज्या 71 व्या स्थानावर आहेत. लंडनमध्ये जन्मलेल्या बजारिया यांचे 2022 मध्ये टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव आहे. मे 2019 मध्ये, सीतारामन यांची भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. (हेही वाचा - FM Nirmala Sitharaman: भारताचे 5G इंटरनेट हे स्वदेशी 5G इंटरनेट, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा थेट अमेरीकेत स्वदेशीचा नारा)

सीतारामन व्यतिरिक्त, फोर्ब्सच्या यादीतील इतर भारतीयांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा या सर्वात तरुण भारतीय महिलेचा समावेश आहे. बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा माधवी पुरी बुच, पोलाद प्राधिकरणाच्या अध्यक्ष सोमा मोंडल आणि Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा या यादीत समावेश आहे. (हेही वाचा - Nirmala Sitharaman: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा सॅन फ्रान्सिस्को यांचा उद्योजकांच्या गोलमेज परिषदेत सहभाग)

दरवर्षी अमेरिकन बिझनेस मॅगझिन जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. यंदाच्या यादीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या पहिल्या क्रमांकावर आहेत.