Zydus (Photo Credits: Twitter)

100 कोटी कोरोना विषाणू लसीकरणाचा (Covid-19 Vaccine) टप्पा गाठण्याकडे झपाट्याने वाटचाल करत असलेल्या केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचे निवेदन आले आहे. सध्या सरकार दोन डोसच्या कोरोना लसीसह नीडल-फ्री लसीच्या तीन डोसचा वापर करण्याचा विचार करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सरकार Zydus Cadila कंपनीची ZyCoV-D ही 3-डोसची नीडल-फ्री लस आपल्या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करू शकते. सरकारच्या मते या लसीच्या डोसची किंमत सध्या दिल्या जाणाऱ्या लसीपेक्षा वेगळी असणार आहे. सध्या सरकार व Zydus Cadila यांच्यामध्ये लसीच्या किंमतीबाबत बोलणी सुरु आहेत.

भारत सरकार आणि फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिला यांच्यामध्ये कोविड लस ZyCov-D च्या किंमतीबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी दरम्यान दोन न सुटलेले मुद्दे समोर आले, जे सरकार सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिले म्हणजे सध्या वापरल्या जाणाऱ्या लसींप्रमाणे, ZyCov-D ला पूर्णपणे प्रभावी होण्यासाठी तीन डोस घ्यावे लागतात, दुसरे म्हणजे, त्यासाठी विशेष Applicator - ‘Tropis ची आवश्यकता असते ज्याची किंमत 30 हजार रुपये असते.

झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. ती वापरासाठी मंजूर झाल्यास, ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते. गेल्या महिन्यात, भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस, ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरामध्ये (EUA) 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता दिली. (हेही वाचा: COVID-19 Vaccination In India: देशात 18 वर्षावरील 25 टक्के लोकांनी कोरोना लसीचे घेतले दोन्ही डोस)

ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 69% लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि 25% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.