ऑनलाईन फूड डिलेव्हरी (Online Food Delivery) कडे खवय्यांचाआजकाल कल वाढला आहे. ब्रेकफास्ट ते डिनर आणि काही ठिकाणी रात्री-अपरात्री देखील अन्नपदार्थ पोहचवले जातात. मुंबईकरांना त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण त्यापैकी झोमॅटो (Zomato) मध्ये मात्र काही मागण्यांसाठी आक्रमक होत डिलेव्हरी बॉईज कडून आज संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपाला शिंदे गटाच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आता हा लढा लढला जाणार आहे.
आठवड्याचा आज पहिलाच दिवस असल्याने कामावर असलेले अनेक जण ऑनलाईन फूड सर्व्हिस अवलंबून असू शकतात. त्यांची या संपामुळे थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
काय आहेत मागण्या?
डिलिव्हरी एजंटला समान ऑर्डर मिळाव्यात आणि पैसे वाढवून मिळावे. पीक अप 3 किमी आणि ड्रॉप 7 किमी असावा. जुन्या मात्र कमी केलेल्या डिलिव्हरी एजंटला पुन्हा कामावर घेण्यात यावं. रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा. इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा आणि इतर मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर जाणार आहेत.
काही ठिकाणी ऑनलाईन फूड डिलेव्हरी दिल्या जाणार्या या एजंटवर कुत्र्यांचा हल्ला झाला आहे. त्यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. त्यामुळे या डिलेव्हरी एजंट अनेकदा जीव धोक्यात घालूनही काम करत आहेत.