वडोदरा: ऑनलाईन Ludo गेम मध्ये हरल्याने संतापलेल्या नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा
Relationship (Photo Credits: PixaBay)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही आहे. मात्र घरात सातत्याने राहून कंटाळलेल्या नागरिकांमध्ये सध्या लुडो (Ludo) हा गेम जाम लोकप्रिय ठरत आहेत. याच दरम्यान वडोदरा (Vadodara)  येथे एक विवाहित दांपत्य ऑनलाईन पद्धतीने लुडो गेम खेळत होते. या गेममध्ये बायकोने नवऱ्याला हरवले असता त्याने  संतप्त होऊन तिच्याशी भांडण करण्यास त्याने सुरुवात केली. या दोघांमधील कडाक्याचे भांडण ऐवढ्या टोकाला गेली की नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण तर केलीच पण तिच्या पाठीचा कणा सुद्धा त्याने मोडला आहे. सध्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

181 अभयम हेल्पलाइन या क्रमांकावर तक्रार करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. काउंसिलरने असे सांगितले आहे की, 24 वर्षीय महिला ही वेमाली येथील राहणारी आहे. ही महिला घरात मुलांचे ट्युशन्स घेते. तर तिचा नवरा एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाउनमुळे हे दोघे घरातच असतात. त्यावेळी टाइमपास म्हणून त्यांनी ऑनलाईन लुडो खेळण्याचा विचार केला. बायकोने नवऱ्याला ऑनलाईन लुडो गेममध्ये 2-3 वेळा हरवले. प्रत्येक वेळी हरल्यावर नवरा बायकोसोबत भांडण करण्यास सुरुवात करायचा. मात्र भांडण ऐवढे जोरात झाले दोघांमध्ये की ते प्रकरण मारहाण करण्यावर पोहचले. नवऱ्याने बायकोला ऐवढे मारले की तिच्या पाठीचा कणाच आता तुटला आहे. त्यानंतर नवऱ्याला त्याची चुक लक्षात येता त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.(Lockdown: घरी पोहचण्यासाठी स्वत:ला भाजीवाली भासवून खरेदी केले तब्बल 25 हजार किलो कांदे, लॉकडाउनला दाखवला ठेंगा)

या प्रकरणी बायकोने नवऱ्याच्या घरी जाण्यास नकार दिला आहे. मात्र काउंसिलिंग केल्यानंतर नवऱ्याने बायकोची माफी मागितल्यानंतर तिने घरी जाणार असल्याचे कबुल केले. मात्र बायकोसोबत अशा प्रकारचे वर्तन किंवा तिच्यावर हात उचचल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सुद्धा ताकिद त्याला देण्यात आली आहे.