
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आगरा (Agra) येथे धक्कादायक घटना घडल्याचे पुढे येत आह. एका 16 वर्षीय अल्पवयीन दिव्यंग मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचर (Unnatural Sexual Offences) झाल्याचे समजते. पीडित मुलास बोलता आणि ऐकता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर घडलेला लैंगिक अत्याचार कोणालाही कोणालाही समजला नाही. त्यालाही त्याच्यासोबत घडलेली घटना कोणाला सांगता आली नाही. मात्र, 20 फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता झालेल्या वैद्यकीय तपासणीवेळी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sex) घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. प्राप्त माहितीनुसार, त्याच्यावर लैंगिक आत्याचाराची घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला दोन आठवड्यांपासून वेदना होत होत्या मात्र त्या कोणालाही समजल्या नाहीत.
पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने तो वेदनेने सैरभैर झाला. परिणामी त्याच्या आई-वडीलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्याच्या गुदद्वारात (Rectum) धारधार वस्तू आढळून आली. डॉक्टारांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारांची गरज असल्याचे सांगत मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पालकांनी पीडिताला 25 फेब्रुवारी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयात त्याच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या गुदद्वारातून पेन बाहेर काढण्यात आला. (हेही वाचा, Shocking! वृद्ध व्यक्तीच्या गुदद्वारात घुसला पहिल्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब; लैंगिक सुखासाठी स्वतः वापर केल्याचा आरोप, जाणून घ्या काय घडले पुढे)
डॉक्टरांनी सदर घटनेबातबत माहिती देताना सांगितले की, आम्ही सीटी स्कॅन केले तेव्हा पीडिताच्या गुदाशयात एक धारधार वस्तू आढळून आली. आम्ही अधिक काळजीपूर्वक पाहिले असता ती वस्तू पेन असल्याचे निष्पन्न झाले. गुदद्वारात घुसवलेले पेन आतच अडकून राहिल्यामुळे पीडिताला वेदना होत होत्या. त्यामुळे तो अस्वस्थ होता. (हेही वाचा, ऐकावे ते नवलच! दोन वर्षांपासून व्यक्तीच्या Penis मधून बाहेर पडत आहे Potty, तर गुदाशयातून निघत आहे मूत्र व वीर्य)
कुटुंबीयांनी पीडिताला विचारले असता पीडिताने त्याला जमले तसे मोडक्यातोडक्या पद्धतीने सांगितले की, 5 फेब्रुवारी रोजी त्याच्या काकाच्या मुलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्या गुदाशयात पेन घातला. पीडिताच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच फेब्रुवारीच्या सायंकाळी मुलगा जेव्हा घरी परताला तेव्हा तो काहीसा घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता. त्याच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा दिसत होत्या. कुटुंबीयांनी त्याला त्याबाबत विचारले असता तो काहीच बोलला नाही.
प्राप्त माहितीनुसार, सदर घटनेबाबत ताईगंज पोलिस ठाण्यात मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 377, 147, 323 नुसार आणि लैंगिक अपराध कायदा 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.