कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याने ब्रिटीश पंतप्रधान Boris Johnson प्रजासत्ताक दिन 2021 निमित्त योजलेला भारत दौरा रद्द करणार? परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले 'हे' उत्तर
British Prime Minister Boris Johnson (Photo Credits: Facebook)

ब्रिटेन (Britain) मध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा स्ट्रेन (New Strain) समोर आल्यानंतर पुन्हा एकदा जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकारच्या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक देश महत्त्वपूर्ण पाऊलं उचलत आहे. दरम्यान, भारत सरकारने 2021 च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2021) प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांना आमंत्रित केले आहे. मात्र ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर बोरिस जॉनसन यांच्या भारतातील आगमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर आज परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. (Indian Republic Day 2021 Chief Guest म्हणून ब्रिटीश पंतप्रधान Boris Johnson यांनी स्वीकारलं आमंत्रण)

प्रजासत्ताक दिनी ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या भारतातील दौऱ्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, "ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम जॉनसन भारतात येतील अशी आम्हाला आशा आहे."

ANI Tweet:

दरम्यान, ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे चेअर ऑफ द कॉऊन्सिल Dr. Chaand Nagpaul यांनी एनडी टीव्ही शी बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरसच्या आढळलेल्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग इतक्याच झपाट्याने पसरत राहिला तर जॉनसन यांचा भारत दौरा रद्द होऊ शकतो.

कोविड-19 चा नवा स्ट्रेन आढळून आला असून तो 70 टक्के अधिक वेगाने पसरत असल्याचे जॉनसन यांनी 19 डिसेंबर रोजी सांगितले. तसंच कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये आढळला असून अजून पर्यंत त्याचे दोन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती युके आरोग्य सचिव Matt Hancock यांनी दिली होती.

दरम्यान, भारतात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एखाद्या देशातील मान्यवरांना बोलावले जाते. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी भारताचे आमंत्रणही स्वीकारले आहे.