पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भर कार्यक्रमामध्ये त्रिपुरा सरकारमधील मंत्री मनोज कांती देब यांचं असभ्य वर्तन, शिक्षणमंत्री संताना चाकमा यांच्या कंबरेवर ठेवला हात
Tripura Minister Caught on Camera Allegedly Groping Colleague (Photo Credits: Twitter | Video Grab)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीमध्ये त्रिपुरा (Tripura) सरकारमधील मंत्री मनोज कांती देब (Manoj Kanti Deb) यांनी महिलेसोबत केलेल्या असभ्य वर्तनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. आगरतळा येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावर असताना मनोज कांती देब यांनी चक्क त्यांच्या समोर चालणार्‍या संताना चाकमा (Shantana Chakma) या महिला मंत्रीच्या कमरेवर हात हात ठेवला. व्यासपीठावर महिलेसोबत खुलेआम अशाप्रकारे वगण्यामुळे सोशल मीडीयात याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.

मनोज कांती देब हे क्रीडा मंत्री आहेत तर संताना चाकमा या त्रिपुराच्या सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्री आहेत. मनोज यांचा स्पर्श समजताच त्यांनी हात झटकला. जाहीर राजकीय कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान समोर असताना एका महिला सह कर्मचार्‍यासोबत अशाप्रकारे असभ्य वर्तन करणं चूकीचं आहे. अशा मंडळींची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी बीजान धार यांनी केली आहे. त्रिपुरा सरकारमध्ये संताना चाकमा या एकमेव महिला मंत्री आहेत.