पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former PM Atal Bihari Vajpayee) यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी (2nd Death Anniversary) निमित्त त्यांचे स्मारक 'सदैव अटल' (Sadaiv Atal) येथे भेट दिली. तसंच त्यांनी भारताच्या राजकारणात दिलेल्या योगदानाचे स्मरण करत ट्विट मार्फतआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "प्रिय अटलजी यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली. अटलींजीनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेली उल्लेखनीय सेवा आणि केलेले प्रयत्न भारत नेहमीच लक्षात ठेवले. या ट्विटसोबत मोदींनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओही जोडला आहे." (भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणातून सांगितलेले रोखठोक विचार)
या व्हिडिओची सुरुवात 'हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं,' या कवितेच्या ओळींनी होते. हा देश अटलजींचे योगदान कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या नेतृत्वात आपण परमाणू शक्तीतही देशाची मान वर केली. पक्ष नेता,संसद सदस्य, मंत्री किंवा पंतप्रधान अटलजींनी प्रत्येक भूमिकेत आदर्श निर्माण केला. अटलजींच्या भाषणाची नेहमीच चर्चा असायची. पण कोणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बारकाईने विश्लेषण केले तर त्यांच्या भाषणापेक्षा कित्येक पटीने अधिक ताकद त्यांच्या मौनात होती. भाषणातही ते एक-दोन वाक्य बोलल्यावर थांबत असतं. पण त्यांच्या त्या मौनातून हजारो लोकांमधील शेवटच्या व्यक्तीलाही त्याचा अर्थ कळतं असे. मी अटलींना आदरांजली अर्पण करतो, असं मोदींनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
ANI Tweet:
Tributes to beloved Atal Ji on his Punya Tithi. India will always remember his outstanding service and efforts towards our nation’s progress. pic.twitter.com/ZF0H3vEPVd
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2020
#WATCH Delhi: President Ram Nath Kovind, Vice President M Venkaiah Naidu & Prime Minister Narendra Modi pay tribute to former PM #AtalBihariVajpayee, on his death anniversary today at 'Sadaiv Atal' - the memorial of Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/pIaYOZFIMZ
— ANI (@ANI) August 16, 2020
दरम्यान, आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सदैव अटल या स्मारकाला भेट देत अटलजींप्रती आदरांजली अर्पण केली. यावेळी अटलजींची कन्या नमिता कौल भट्टाचार्य आणि नात निहारिका या देखील उपस्थित होत्या.