Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 15 लाखांच्या पार; 24 तासांत 768 बळी
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा एकूण आकडा आज (29 जुलै) 15 लाख 31 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये 768 जणांची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान भारतामध्ये आतापर्यंत एकूण 9,88,029 जणांची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई यशस्वी ठरली आहे. दरम्यान भरतातील एकूण मृतांचा आकडा 34 हजार 193 पर्यंत पोहचला आहे.

भारतामध्ये मागील काही दिवस सातत्याने 45 हजारांपेक्षा अधिक रूग्ण समोर येत असले तरीही त्याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होऊन देखील घरी परतत असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 5,09,447इतकी आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशात सुमारे 1,77,43,740 सॅम्पल कोविड 19 साठी तपासले आहेत. यामध्ये 4,08,855 सॅम्पल काल तपासण्यात आले आहेत.

ANI Tweet

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता कोरोना व्हायरसवर यश मिळत असल्याचं चित्र सध्या आहे. काल आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुमारे 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 7 हजारांहून अधिक नव्या रूग्णांची भर पडली आहे. मुंबई मधील स्थिती देखील दिलासादायक आहे. काल पहिला सिरो सर्व्हे जाहीर करण्यात आला असून त्याच्या निष्कर्षानुसार 3 विभगाअंमध्ये झालेल्या चाचणीत सरासरी 40% लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे.