भारतात (India) कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीअसून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. भारतात कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा 147 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, हे रुग्ण दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील होते. सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे देशात महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात हा 42 रुग्ण आढळून आल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळ राज्यात 30 रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना व्हायरस प्रार्दुभाव होऊ नये यासाठी महाराष्ट्रात सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.
पाहा संपूर्ण देशाची यादी:
Ministry of Health and Family Welfare: Total number of confirmed #COVID19 cases in India rises to 147 - comprising 122 Indian nationals and 25 foreign nationals (as on 18.03.2020 at 09:00 AM) pic.twitter.com/Lzw64idp5F
— ANI (@ANI) March 18, 2020
हेदेखील वाचा- कोरोना व्हायरस संकट काळात BMC ने जारी केले महत्वाचे नियम; रस्त्यावर थुंकल्यास होणार 1000 रुपये दंड, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रात आढळून आलेल्या 42 रुग्णांपैकी 38 रुग्ण हे भारतीय असून 3 परदेशी नागरिक आहेत. तर मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण कोरोना ग्रस्तांचा आकडा पाहिला तर 122 भारतीय रुग्ण, 25 परदेशी नागरिक आहेत. तसेच 14 रुग्ण बरे झाले आहेत. भारतात एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका विचारात घेऊन मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये तसेच, कोरोना व्हायरस (Coronavirus) संभाव्य संसर्ग टळावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईतील ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे.