Today gold price: सोन्याच्या किंमतीत पुन्हा बदल, जाणून घ्या आजचा दर किती ?
Jewellery (Photo Credits: Pixabay)

दिवसेंदिवस सोन्याचा भाव वाढत चालला आहे. आज भारतात सोन्याच्या किंमतीत 0.02% ची वाढ दिसून आली. आता सोने 47900 रुपयांवरून 47910 रुपये इतके झाले आहे. मागील आठवड्यात सोने सरासरीपेक्षा 0.12% वाढीसह 47844.3 रुपये होते.

भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी जागतिक बाजारातील सोन्याच्या किंमतीत 0.03% च्या तुलनेत भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती 0.02% ने कमी झाल्या आहेत. मात्र असे असले तरीदेखील या आकडेवारीत चढउतार कायम आहे.

सोन्याच्या सरासरी किंमतीपेक्षा ही किंमत पातळी 8.08% जास्त आहे.  इतर मौल्यवान धातूंपैकी आज चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. चांदी 0.36% टक्क्यांसह 26.01 रुपयांनी वाढली आहे. चांदीनंतर प्लॅटिनमच्या किंमतीतही वाढ दिसून आली. मौल्यवान धातू प्लॅटिनम 0.36% वाढून प्रति ट्रॉऔंस 1113.5 रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान, MCX वर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47955 रुपये इतकी होती. त्यामध्ये 67.01 रुपये इतका बदल झाला आहे. तसेच भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 47900 रुपये झाली आहे.

भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 0.14% ने वाढून 47955 रुपयांवर पोहचले आहे. मागील सत्रात या चढउतारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 0.25% किंवा सुमारे 67.1 रुपये होते. MCX वर चांदीचा दर प्रतिकिलो 69260 रुपये आहे.

आज सोन्याच्या स्पॉट किंमतीत कालच्या तुलनेत आज 1.01 टक्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर जागतिक स्पॉट किमतींमध्ये आज 4 डॉलरची वाढ झाली असून डॉलरचे मूल्य वाढले आहे. MCX च्या भावी किंमतीत आज 67.1 टक्क्यांनी मूल्यासह वाढ झाली आहे. कालपेक्षा डॉलर आणि रुपयाचे यांचे मुल्य स्थिर आहे. सोन्याच्या भावातील आज कोणतेही चढउतारचा डॉलरच्या मूल्याशी काही संबंध नसल्याचं यातून स्पष्ट होतं.

या काळात सोन्याचे मुल्य अनेक वेळा घसरून पुन्हा वाढले आहे. भारतीय तसेच जागतिक बाजारात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आहे. सोन्याप्रमाणे इतर अनेक धातू जागतिक बाजारात उसळी मारत असतात. सोन्याप्रमाणेच त्यांचे मुल्यही कमी जास्त होत असते.