भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात गोवा (Goa) हे पहिले राज्य आहे जे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र मुंबई आणि गुजरातमधून गेलेल्या लोकांमुळे या राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळले. ही संख्या हळूहळू वाढत जाऊन आता 31 वर पोहोचली आहे. त्यात रविवारी मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये 8 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. TrueNat टेस्टिंग मध्ये हे 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे 31 रुग्ण सध्या गोव्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1 मे ला गोवा ग्रीन म्हणून घोषित करण्यात आले होते. गोवा राज्यात कोणताही समुदाय नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दावा केला होता.
गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा रेल्वे स्थानकात विशेष रेल्वेला थांबा देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती.
#UPDATE Goa: Three more passengers - a total of 7 people - who travelled in Mumbai-Goa train on Sunday, test positive for #COVID19 during TrueNat testing. The total number of active cases in Goa reaches 29. https://t.co/HJbmbHwHIO
— ANI (@ANI) May 18, 2020
देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90, 927 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या पाहता सध्या भारतासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गोव्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गुजरात येथून माल घेऊन आलेल्या ट्रकमधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई येथून गोव्यात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण आणि त्यांच्या ड्रायव्हरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.