Monkey Attack foiled with Help Of Alexa:  कुत्र्याच्या आवजाची व्हॉईस कमांड देत घरात किशोरवयीन मुलीने चिमुकलीला वाचवलं माकड्यांच्या हल्ल्यामधून!
Monkey | Representational image (Photo Credits: pixabay)

उत्तर प्रदेश मध्ये व्हर्च्युअल असिस्टंट टेक्नॉलॉजी ची मदत घेत एका किशोरवयीन मुलीने स्वतःची आणि बहिणीची मोठ्या संकटातून सुटका केली आहे. लखनौ च्या कोतवाली पोलिस हद्दीतील आवास विकास कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात माकडांचा वावर आहे. याच भागामध्ये पंकज ओझा नामक व्यक्तीच्या घरात पाहुणे आले होते. ते आत आल्यानंतर त्यांनी घराचं दार उघडंच ठेवलं होतं. काही वेळात माकडांनी घरात प्रवेश केला.

माकड घरात येताच त्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. पहिल्याच मजल्यावर स्वयंपाकघर असल्याने तिथे त्यांनी धुमाकूळ घातला. स्वयंपाकघराच्या बाजूका 13 वर्षीय निकिता आपल्या 15 महिन्यांच्या भाची सोबत खेळत होती. त्यांनी आपल्या दिशेने माकड येत असल्याचं पाहिलं. अशा परिस्थिती मध्ये निकिताने प्रसंगावधान ठेवत ‘Alexa’ला व्हॉईस कमांड देत भुंकणार्‍या कुत्र्याचा आवाज काढण्याची कमांड दिली. निकीताची युक्ती कामाला आली. माकडांनी कुत्र्यांचा आवाज ऐकताच तिथून पळ काढला. Agra मध्ये Taj Mahal च्या आवारात स्पॅनिश महिलेवर माकडाचा हल्ला, चावा (Watch Video).

 पहा ट्वीट

TOI शी बोलताना निकिताने,' घरात माकडं आली तेव्हा जवळ घरातलं कुणीच वडीलधारी व्यक्ती नसल्याचं सांगितलं. हा हल्ला रोखण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. तेव्हा फ्रीज वर अमेझॉन चं अलेक्स पडलेलं दिसलं. त्यावर कुत्र्याच्या आवाजाची कमांड दिली. ही ट्रिक चालेल की नाही याचा विचार केला नव्हता पण सुदैवाने कुत्र्याच्या आवाजाने माकडं घाबरली आणि गेली.'