Supreme Court | (File Image)

मुंबईमध्ये जैन धर्मियांसाठी पवित्र असलेल्या पर्युषण पर्वाच्या (Paryushan 2020) पार्श्वभूमीवर दादर (Dadar), भायखळा (Byculla), चेंबूर (Chembur) भागात जैन मंदीरं खुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही मंदिरं केवळ 22 आणि 23 ऑगस्ट दिवशी खुली राहतील. मात्र त्यावेळेसही जैन बांधवांनी केंद्र सरकारने धार्मिय स्थळं उघडण्यासाठी घालून दिलेली नियमावली याचं पालन करणं आवश्यक आहे.

मुंबईतील जैन धर्मियांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ही विशेष सूट दिली आहे. 22 ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. मात्र त्यासाठी विशेष परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही हिंदू धर्मीयांची मंदिरं उघडली जाणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे (Chief Justice SA Bobde) यांच्या खंडपीठासमोर झाली आहे.

ANI Tweet

महाराष्ट्रामध्ये 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे. दरम्यान त्याच्या आधीपासूनच अनेक मंदिरं, मस्जिद, चर्च सह प्रार्थनास्थळं राज्यात बंद आहेत. कोणत्याही धर्मातील भाविकांना मागील 4-5 महिन्यात प्रार्थनास्थळांमध्ये जाण्यास परवानगी नव्हती. मात्र जैन धर्मियांचे पर्युषण पर्वातील अखेरचे दोन दिवस 22,23 ऑगस्ट आहेत. त्यांच्या या वार्षिक मंगलपर्वात सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. देशभरात अनलॉक जाहीर करताना मंदिरं खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू राज्यात अद्याप मिशन बिगिन अगेन अंतर्गत धार्मिकस्थळं बंदच ठेवण्याचा आदेश आहे.