Delhi Violence: मौजपुर आणि ब्रह्मपुरी येथे पुन्हा दगडफेक; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आमदरांसह तातडीची बैठक
Rapid Action Force march (Photo Credit: ANI)

दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendenment Act) यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन गटात उफाळलेल्या वादामुळे तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ झाली. काल (24 फेब्रुवारी) झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 105 लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत तणावपूर्ण वातावरण असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील हिंसा झालेल्या भागातील आमदार आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. हिंसाचाराचा पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी काल रात्री दिल्लीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे प्रमुख अधिकारी यांच्यासह बैठक घेतली.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद, मौजपुर-बाबरपुर, गोकुलपुरी, जौहरी एनक्लेव आणि शिव विहार यांचे प्रवेशद्वार बंद राहतील. केवळ मेट्रो वेलकम स्टेशनपर्यंत प्रवास करण्याची परवागनी देण्यात आली आहे. (दिल्ली हिंसाचार: 8 राऊंड फायरिंग करणारा तरूण 'शाहरूख' पोलिसांच्या अटकेत)

दिल्लीतील बह्मपूरी आणि मौजपूरी परिसकारत आज सकाळी देखील दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 10 वी-12वी च्या बोर्डाच्या परीक्षांसह 11 वीच्या परीक्षा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. तसंच सरकारी व प्रायव्हेट शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.गेल्या दोन दिवसांपासून CAA विरोधात सुरु असलेल्या आंदोलकांमधील दोन गटात वाद उफाळला आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. यानंतर मौजपूर आणि जाफराबाद यांसारख्या हिंसाग्रस्त क्षेत्रांत सीआरपीएफच्या आठ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी ब्रह्मपूरी भागात मार्च काढला.

हिंसाचारामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणण्याचा  दिल्ली पोलिस प्रयत्न करत आहेत. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले असून राज्य गृहमंत्रालयाने मुंबईत सतर्कतेचा इशारा दिला आहे.